रस्त्यावर राहणाऱ्या कुटूंबातील मुलांचे भविष्य घडविण्याचा विचार बृहन्मुंबई महानगरपालिका करीत असून या मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेला पाठविण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी रवींद्र भिसे यांनी दिली. याबाबत निश्चित संकल्पना ठरवून प्रस्ताव शिक्षण परिषदेला देण्यात आला आहे. मुंबईत चार ठिकाणी अशा शाळा सुरू करण्यात येतील. मुंबईत उपजीविकेसाठी येणाऱ्या हंगामी कामगारांच्या मुलांनाही या शाळेत समाविष्ट करून घेण्याबाबत विचार आहे.