२०० ते २००० चौरस फुटाच्या जागेची आवश्यकता
मुंबई : नागरिकांना घराशेजारी प्रतिबंधात्मक व प्राथमिक उपचार सुविधा देण्यासाठी पालिकेने आणलेल्या बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र योजनेअंतर्गत कंटेनरमधील दवाखान्यांसाठीही जागा उपलब्ध होत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे अखेर पालिकेने नागरिकांनाच जागा भाड्याने देण्याचे आवाहन केले आहे. झोपडपट्टी परिसरात २०० ते २०००चौरस फुटाची जागा असलेल्या मालकांना पालिकेने आवाहन केले आहे.
पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी पालिकेने बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र योजना आणली होती. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात त्याची घोषणा करण्यात आली. घराशेजारी आरोग्य केंद्र व वैद्यकीय तपासणी करता यावी यासाठी ही योजना आखण्यात आली. बहुतांशी वेळा लहान सहान आजारांसाठी नागरिक उपनगरातून प्रमुख रुग्णालयाकडे येतात. दात, त्वचा, कान अशा आजारांसाठीचे रुग्ण येत असल्यामुळे प्रमुख रुग्णालयांवरील ताण वाढतो. त्यामुळे अधिक गुंतागुंतीचे उपचार आवश्यक असलेल्या रुग्णांना सेवा देता येत नाही. त्यामुळे पालिकेचे सध्या असलेले दवाखाने अद्ययावत करून तेथे १३९ प्रकारच्या विविध चाचण्या करता याव्यात व उपचार देता यावेत याकरीता पालिकेने ही योजना आणली.
हेही वाचा >>> जोगेश्वरी टर्मिनसच्या कामाला आठ महिन्यानंतर सुरुवात ; रेखाचित्र तयार करण्याचे काम सुरु मेल-एक्स्प्रेस गाड्या सुटणार
या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १०० दवाखाने व नंतर आणखी १०० दवाखाने बांधण्यात येणार होते. सद्यस्थितीत १८७ दवाखाने, २११ आरोग्य केंद्रे व २८ प्रसुतीगृहे कार्यान्वित आहेत. यामध्ये आणखी भर टाकून ‘हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना’ आपल्या घराशेजारी या आरोग्यसेवेच्या नविन संकल्पनेतंर्गत सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्याचा आरोग्य विभागाचा विचार होता. हे’दवाखाने’ कंटेनरमध्ये झोपडपट्टी विभागामध्ये सुरु करण्यात येणार होते. मात्र कंटेनर ठेवण्यासाठी जागा मिळत नसल्यामुळे ही योजना रखडली आहे.
यावर उपाय म्हणून देवनार, गोवंडीचा भाग असलेल्या एम पूर्व विभाग कार्यालयाने जागा मालकांना आवाहन केले आहे. झोपडपट्टी परिसरात २०० ते २००० चौरस फुटाची जागा असलेल्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. तळमजल्यावरील जागेला प्राधान्य देण्यात येणार असून योग्य वाटल्यास पहिल्या मजल्यावरील जागेचाही विचार करण्यात येणार आहे. इच्छुक जगाच्या मालकाने एम पूर्व विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अटी काय ?
* जागा झोपडपट्टीत किंवा झोपडपट्टीजवळ हवी.
* चोवीस तास पाणी असलेले शौचालय हवे, २०० लिटर पाणी साठवण्याची सोय हवी
* जागा व्यावसायिक वापरासाठी योग्य असावी, जागेचे वैध फोटो पास, किंवा सर्वेक्षण पावती हवी, कराची पूर्तता केलेली असावी
* आवारात पुरेशी विद्युत जोडणी हवी
* आवश्यक असल्यास किरकोळ दुरुस्तीसाठी जागा मालकाने परवानगी द्यावी
* पाच वर्षांसाठी जागा भाड्याने देण्याची तयारी हवी