मुंबई : प्रदूषण नियंत्रणासाठी एका बाजूला मुंबई महापालिकेने कठोर पावले उचललेली असताना मंडळाने पालिकेच्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पालाच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमावलीची अंमलबजावणी केली जात नसल्याचे आढळल्यामुळे ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी सोमवारी पालिकेचे अधिकारी, कंत्राटदार यांना सुनावणीसाठी बोलवण्यात आले आहे.

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) कठोर पावले उचलली आहेत. बोरिवली आणि भायखळ्यातील हवेचा स्तर खालावल्यामुळे या भागातील बांधकामांना सरसकट बंदी लागू करण्यात आली होती. मात्र पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळले जात नसल्याचे एमपीसीबीच्या पाहणीच्यावेळी आढळून आले होते. त्यामुळे या प्रकल्पाला पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत एमपीसीबीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक व्ही एम मोटघारे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
Vishal Gawli in custody at Naupada police station thane news
विशाल गवळी नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत, रेल्वे मार्गे गाठले होते बुलढाणा
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
loksatta readers feedback
लोकमानस: राज्यात आरोग्यव्यवस्थेकडे दुर्लक्षच होणार?
Vasai Virar Municipal corporaton , Water Supply Vasai Virar, Water Team Vasai Virar ,
वसई : पालिकेचे पाणी पथक स्थापन, आमदारांनी खडसावताच पालिका सक्रिय

हेही वाचा…सरंपच हत्याप्रकरणात वंजारी समाजाची बदनामी,आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दावा

एमपीसीबीच्या पथकाने सागरी किनारा मार्गाची नुकतीच पाहणी केली होती. त्यावेळी या प्रकल्पाच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणाच्या नियमावलीची अंमलबजावणी केली जात नसल्याचे आढळून आले होते. या ठिकाणी राडारोडा तसाच पडला होता, राडारोडावर पाणी फवारणी केली जात नव्हती. त्यामुळे या परिसरात धुळीचे लोट दिसत होते असे आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मंडळाने सागरी किनारा प्रकल्पाच्या कामामुळे होणा-या हवा प्रदूषणाबाबत कारणे दाखवा नोटीस बजाविलेली असून त्यांना वैयक्तिक सुनावणीकरिता कृती आराखडयासहित सोमवारी बोलवण्यात आले आहे. प्रकल्पाचे मुख्य अभियंता आणि प्रकल्पाचे तीन कंत्राटदार यांनाही सुनावणीसाठी बोलवण्यात आले आहे.

हेही वाचा…दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करून गोरखपूरला नवी गाडी

व्ही. एम. मोटघारे, एमपीसीबी (सहसंचालक)

सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या ठिकाणी ज्या काही प्रदूषण नियंत्रणाबाबतच्या त्रुटी असतील त्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका

Story img Loader