BMW Car Accident : देशभरात दररोज अपघाताच्या अनेक घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. यात अनेकदा काही अपघातांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात. आता काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडतात. मात्र, आता अशाच प्रकारचा एक अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिला तरी अक्षरश: अंगावर काटा येतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मुंबईच्या कोस्टल रोडवरील एका बीएमडब्ल्यू कारच्या अपघाताचा आहे.

व्हायरल व्हिडीओत नेमकं काय?

एका बीएमडब्ल्यू कारच्या अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कोस्टल रोड दिसत आहे. तसेच या रोडवरून मोठ्या प्रमाणात वाहने जात असल्याचंही पाहायला मिळत आहे. पण या रस्त्यावरून अनेक वाहने जात असताना अचानक एक बीएमडब्ल्यू कार अतिशय वेगाने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच ही कार वेगाने आल्यानंतर समोर असलेल्या वाहनांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं. पण ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असतानाच ही गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हाईडरला धडक देऊन लेन बदलून विरुद्ध दिशेच्या डिव्हाईडरला धडकल्याचं दिसत आहे.

२ मार्च रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे. दरम्यान, या अपघाताचा हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न करत असताना हा अपघात घडल्याचं सांगितलं जातं. तसेच या अपघाताच्या थरारावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, या अपघातात सुदैवाने कोणतीतीही जीवीत हानी झालेली नाही. तसेच या प्रकरणी वरळी पोलिसांनी या बीएमडब्ल्यू कार चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. या अपघाताच्या घटनेत संबंधित बीएमडब्ल्यू गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचंही सांगितलं जातं.

Story img Loader