फेब्रुवारी-मार्च, २०१५मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी (बारावी) अर्ज भरण्याची १४ ऑक्टोबरची मुदत मुदत आठ दिवसांनी वाढविण्यात आली आहे. हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आल्याने दिलेल्या मुदतीत बारावीचे ऑनलाइन अर्ज भरून होणे शक्य नव्हते. आता नियमित शुल्काप्रमाणे २१ ऑक्टोबपर्यंत बारावीचे अर्ज भरता येतील. तर विलंबित शुल्काप्रमाणे ३१ ऑक्टोबपर्यंत अर्ज भरता येतील. हे अर्ज http://www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत.

Story img Loader