वांद्रे-वरळी सागरीसेतूवरून उडी मारून आत्महत्या केलेल्या टिकम लक्ष्मणदास मकिजा (५६) यांचा दुपारी दीडच्या सुमारास दादर चौपाटी भागात मृतदेह तरंगताना दिसून आला. हेलिकॉप्टरच्या मदतीने तो बाहेर काढण्यात आला आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून अधिक तपास करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबईः चपलेत लपवले कोट्यावधींचे सोने; परदेशी महिला अटक

खार परिसरात राहणारे टिकम हे सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास गाडीने सागरी सेतूवर येऊन थांबले. तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यांना हटकताच त्यांनी सुरक्षा रक्षक पुढे येईपर्यंत सागरीसेतूवरून उडी मारली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली. सुरुवातील नौसेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मिळून आले नाही. बचाव पथकाकडून रात्री उशिरापर्यंत शोधमोहिम राबवण्यात आली. त्यापाठोपाठ मंगळवारी सकाळपासून नौसेनेच्या पथकाने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पुन्हा शोध मोहिम सुरू करण्यात आली. अखेर दुपारच्या सुमारास दादर चौपाटी भागात त्यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यानुसार, हेलिकॉप्टरच्या मदतीने तो बाहेर काढण्यात आला आहे. या घटनेने टिकम यांच्या कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अपघाताच्या घटनेमुळे त्यांनी यापूर्वीच जीवन संपविण्याबाबत वक्तव्य केले होते. त्याच तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Body of 56 year old man who jumped from bandra worli sea link found mumbai print news zws