मुंबईतील कुर्ला भागात एक अतिशय खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी एका नाल्यामध्ये एका पोत्यात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या महिलेचे हात आणि पाय दोरीने करकचून बांधलेले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिलेचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली. या महिलेचा खून करून नंतर तिचा मृतदेह नाल्यात फेकला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

घटेनेबाबत माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी तो पुढे पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Body of a woman with tied limbs found inside a sack at a drain in mumbais kurla area msr