मुंबईतल्या नेहरु नगर या भागात एका महिला सब इन्स्पेक्टरचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिला सब इन्स्पेक्टरचं नाव शीतल एडके असं आहे. ३५ वर्षीय शीतल एडके या मागच्या दीड वर्षांपासून सिक लिव्ह म्हणजेच आजारपणाच्या सुट्टीवर होत्या. ANI ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या ठिकाणी कुठलीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही. झोन ६ चे DCP हेमराज राजपूत यांनी हे ठिकाणी दाखल झाले होते. आम्ही या प्रकरणी पुढील तपास करत आहोत असंही राजपूत यांनी म्हटलं आहे.

शीतल एडके या मुंबईतल्या नेहरु नगर भागात असलेल्या भाडे तत्त्वाच्या घरात रहात होत्या. त्यांचा मृतदेह घरातच होता. त्या मृतदेहाला दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर शीतल एडके यांचा मृतदेह या घरात आढळून आला. प्राथमिक तपासात हे प्रकरण आत्महत्येचं आहे असं पोलिसांना वाटतं आहे. पोलिसांनी या प्रकरणात ADR दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Story img Loader