ठाणे महापालिकेतील बोगस डॉक्टर भरती प्रकरणी प्राथमिक चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी अतिरीक्त आयुक्तांना दिले आहेत. तसेच नियुक्ती समितीतील सर्व सदस्यांनाही त्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून संबंधिताना तीन दिवसात अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले आहेत.
ठाणे महापालिकेने मोहम्मद झुबेर कुरेशी या बोगस डॉक्टरला सेवेत रुजू करून घेतले होते. त्यासाठी कुरेशी याने बोगस कागदपत्रे महापालिकेत सादर केली होती. दरम्यान, ही बाब उघडकीस आल्यानंतर महापालिका प्रशासनाने त्याची सेवा संपुष्टात आणली. तसेच बोगस कागद पत्रांच्या आधारे महापालिका प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आयुक्त राजीव यांनी अतिरीक्त आयुक्तांना प्राथमिक चौकशी करून त्याचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कुरेशी याची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करणाऱ्या नियुक्ती समितीतील सर्व सदस्यांना राजीव यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून संबंधितांना तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Story img Loader