अभिनेता संजय दत्त गुरुवारी टाडा न्यायालयासमोर शिक्षा भोगण्यासाठी शरण येणार असतानाच बुधवारी बॉलिवूडमधील काही कलाकारांनी त्याची भेट घेतली. अभिनेता सलमान खान, अजय देवगण, अभिषेक बच्चन, सोनू सूद, दीपिका पदुकोण, रझा मुराद  यांच्यासह इतर काही जण बुधवारी सध्याकाळी संजयच्या निवासस्थान पोहोचले. या सर्वांनी संजयला शिक्षेला सामोरे जाण्यासाठी धीर दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला दोषी ठरवून त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. या पैकी दीड वर्षांची शिक्षा संजय दत्तने अगोदर भोगली असल्यामुळे त्याला आणखी साडेतीन वर्षे शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात जावे लागणार आहे. त्याला पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगावी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actors visited sanjay dutts home