मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी परदेशातील आपल्या आवडत्या ठिकाणी जाण्याचा शिरस्ता बॉलिवूड कलाकारांनी यंदाही नेमाने पाळला. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, कतरिना कैफ, करीना कपूर खान ते तृप्ती डिमरी, वेदांग रैना सारख्या नव्या जुन्या बॉलिवूड कलाकारांनी वेगवेगळ्या देशांत पर्यटनाचा आनंद घेत नववर्षाचे स्वागत केले. ऑस्ट्रेलिया, दुबई, फिनलंड, स्वित्झर्लंड अशा विविध देशांत तारांकितांनी सुट्टीचा आनंद घेतला.

वर्षभरातील चित्रीकरणाचे व्यग्र वेळापत्रक आणि प्रसिध्दी कार्यक्रम यातून वेळ काढून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परदेशातील आपल्या आवडत्या ठिकाणी जायचे आणि तेथे नव्या वर्षाचे स्वागत आणि जल्लोष अनुभवायचा हा अनेक बॉलिवूड कलाकारांचा दरवर्षीचा ठरलेला बेत असतो. यंदाही बॉलिवूडमधील अनेक कलाकार नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने परदेशात आहेत. अभिनेत्री करीना कपूर खान दरवर्षी पती सैफ अली खान आणि मुलांसह सुट्टीसाठी परदेशात फिरायला जाते. यंदा करीना नववर्षाच्या स्वागतासाठी स्वित्झर्लंडमध्ये आहे. तर ‘भुलभुलैय्या ३’ या चित्रपटाच्या यशामुळे आनंदात असलेल्या अभिनेत्री तृप्ती डिमरीने सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फिनलंडला पसंती दिली आहे. गेल्या वर्षी ‘द आर्चीज’ या चित्रपटातून पदार्पण केलेला आणि आलिया भट्टबरोबर ‘जिगरा’ चित्रपटात झळकलेल्या अभिनेता वेदांग रैनाने मालदीवमध्ये नवीन वर्षाचे स्वागत केले.

adinath kothare
आदिनाथ कोठारे नव्या भूमिकेतून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; फोटो पोस्ट करत सांगितलं चित्रपटाचं नाव
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mahesh Manjrekar
“प्रेक्षकांना नेहमी…” महेश मांजरेकर यांना नवीन कलाकारांविषयी काय वाटतं? म्हणाले, “मला कौतुक…”
Jaipur Literature Festival Books Literature Culture
जयपूर साहित्य महोत्सव: नकली श्रीमंती नव्हे… अस्सल समृद्धी
Ashish Shelar , Marathi Film Katta , Versova,
यंदाचे वर्ष मराठी माणसांसाठी आनंददायी – ॲड. आशिष शेलार, वर्सोवा येथे ‘मराठी चित्रपट कट्टा’चे लोकार्पण
संदूक: आव्हानात्मक ‘लायर’
National Sports Championship inaugurated in Uttarakhand sports news
तंदुरुस्त भारत घडवा! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे युवकांना आवाहन; उत्तराखंडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
चीनच्या निर्मिती क्षेत्रात घसरण; जानेवारीत वेग मंदावला

हेही वाचा…उच्च न्यायालयातील वकिलाची दीड कोटींची सायबर फसवणूक

अभिनेत्री शिल्पा शेट्टीही आपल्या कुटुंबाबरोबर दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी सु्ट्टी घालवण्यावर भर देते. यंदा डिसेंबरमध्ये नाताळच्या आसपास लंडनमध्ये पोहोचलेल्या शिल्पाने हाईड पार्क येथे होणाऱ्या ‘विंटर वंडरलँड’ या वार्षिक जत्रेचाही आनंद घेतला. नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान भरणाऱ्या या विंटर वंडरलँडला भेट देत आपल्या मुलांबरोबरची छायाचित्रेही तिने समाजमाध्यमांवर टाकली. नुकतीच विवाहबध्द झालेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने पती झहीर इक्बालबरोबर ऑस्ट्रेलियात सुट्टी घालवली. सिडनी येथे नववर्षाचे स्वागत करतानाची छायाचित्रेही तिने समाजमाध्यमांवर टाकली होती. या छायाचित्रांमुळे तिच्यावर टीकाही झाली. दिवाळीत मुंंबईतील फटाक्यांच्या आतषबाजीची छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकत तिने फटाके फोडून प्रदूषण केले जाते म्हणून टीका केली होती. मात्र सिडनीत नववर्षाच्या निमित्ताने झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीची छायाचित्रे कौतुकाने टाकणाऱ्या सोनाक्षीवर चाहत्यांकडून टीका करण्यात आली. अभिनेत्री तमन्ना भाटियाने टेक्सासमध्ये तर अभिनेत्री दिया मिर्झाने आपल्या मुलांबरोबर श्रीलंंकेत नववर्षाचे स्वागत केले. तर सध्या अभिनेता धनुषबरोबरच्या वादामुळे आणि नेटफ्लिक्सवरील वेबमालिकेमुळे चर्चेत असलेली दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा, पती विघ्नेश आणि अभिनेता आर. माधवन आणि त्याची पत्नी यांनी एकत्र दुबईत नववर्षाचे स्वागत केले. अजय देवगण-काजोल, रणबीर-आलिया अशा अनेक बॉलिवूड कलाकार इथेच कुटुंबाबरोबर एकत्रित नववर्षाच्या स्वागतात सहभागी झाले होते.

Story img Loader