अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक यांना धक्का बसलाय. जिया खानचा हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणाचा सिनेमा ‘निःशब्द’मध्ये तिने बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले होते. तिच्या आत्महत्येबद्दल कळल्यावर अमिताभ बच्चन यांनी या घटनेवर आपला विश्वासच बसत नाही. या स्वरुपाचे ट्विट केले. 
राम गोपाल वर्मा यांनी ‘निःशब्द’चे दिग्दर्शन केले होते. त्यांनीदेखील जियाच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली. पदार्पणाच्या सिनेमात जिया खान इतकी ऊर्जा आणि उत्साह घेऊन आलेली दुसरी अभिनेत्री मी आतापर्यंत पाहिली नाही, असे राम गोपाल वर्मा यांनी ट्विट केलंय. अभिनेता रितेश देशमुख यानेही जियाच्या अकाली एक्झिटबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. रितेशने जियासोबत हाऊसफुल्ल सिनेमात काम केलं होते. जियाकडे उत्तम विनोदबुद्धी होती. चांगली मैत्रीण झालेली जिया कायम स्मरणात राहिल, असे रितेशने ट्विटरवर म्हटले आहे. जियाची आत्महत्या ही अतिशय धक्कादायक बातमी असल्याचे अभिनेत्री सोनम कपूरने म्हटले आहे.

Story img Loader