गेली पाच दशके विविध चित्रपटांच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.चोप्रा यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने शनिवारी कुटुंबीयांनी त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल केले.
चोप्रा यांना कोणत्या कारणासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले ते रुग्णालयाकडून समजू शकलेले नाही.  चोप्रा यांना डेंग्यू झाला असल्याचे बोलले जात आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

Story img Loader