लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : मुंबई विमानतळाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून विमानतळाच्या टर्मिनल-१ वर बॉम्ब असल्याचे सांगून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुंबई पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. धमकीच्या दूरध्वनीनंतर सर्व संबंधित सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या.

Case registered against two employees of Tinco company in air leak case Badlapur news
वायु गळती प्रकरणी गुन्हा दाखल; टिनको कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
nia raided Chayanagar Amravati and detained suspected youth for questioning
‘एनआयए’ची अमरावतीत छापेमारी; संशयित युवक ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन….
Six people arrested for smuggling gold worth Rs 10 crore Mumbai news
दहा कोटींच्या सोन्याच्या तस्करीत सहा जणांना अटक; तीन आरोपी विमानतळावरील कर्मचारी
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
Mumbai, gold, silver , Accused arrested with gold,
मुंबई : १९ कोटींच्या सोन्या, चांदीसह आरोपीला अटक
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-१ वरील वरिष्ठ कार्यकारी अधिकारी गीतांजली नेरुरकर (३७) शुक्रवारी सकाळी कामावर उपस्थित होत्या. त्यावेळी तेथील संपर्क क्रमांकावर एका अनोळखी क्रमांकावरून दूरध्वनी आला. टर्मिनल – १ वर बॉम्ब ठेवण्यात आल्याचे दूरध्वनी करणाऱ्याने सांगितले. आपण कोठून फोन करत आहात, अशी विचारणा नेरूरकर यांनी त्याला केली. तेव्हा त्याने इंग्रजीत ‘नवपाडा’ असे उत्तर दिले. त्यानंतर तुम्हाला शुभेच्छा असे सांगून त्याने दूरध्वनी ठेवला.

आणखी वाचा-कलिना संकुलातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना बाटलीबंद पाणी, मुंबई विद्यापीठाकडून खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय

नेरुरकर यांनी ताबडतोब त्यांच्या वरिष्ठांना ही बाब कळवली. त्यानंतर विमानतळवरील अधिकाऱ्यांनी तात्काळ बॉम्ब थ्रेट असेसमेंट समितीची बैठक घेतली. सर्व संबंधित सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले. त्यानंतर तातडीने विमानतळाची तपासणी करण्यात आली. मात्र काहीच संशयस्पद सापडले नाही.

याप्रकरणी तक्रारीनंतर विमानतळ पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५ (१) (बी), ५०६ (२) आणि ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. दूरध्वनी करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्याचाही प्रयत्न सुरू आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीला अटक केल्यानंतरच धमकीच्या दूरध्वनीमागील नेमके कारण समजू शकेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader