मुंबईः मुंबईतील ‘हॉटेल द ललीत’मध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवले असून त्यांचा स्फोट होऊ नये यासाठी पाच कोटी रुपये खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहार पोलिसांनी अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून हॉटेलमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. यापूर्वी वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षालाही धमकीचे संदेश आले होते.

हॉटेल ललीतमध्ये सोमवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास फोन करून वरील धमकी देण्यात आली होती. यानंतर हॉटेलमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. धमकी देणाऱ्या व्यक्तीने हॉटेमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. तसेच हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले बॉम्ब निकामी करण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडीणीची मागणी करण्यात आली. तसेच हॉटेलच्या महाव्यवस्थापकाच्या कुटुंबियांनाही धमकावण्यात आले आहे. हॉटेल प्रशासनाने या धमकीबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी कलम ३८५, ३३६ आणि कलम ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

Story img Loader