‘काळा घोडा कला महोत्सव’, ‘राज्य कला प्रदर्शन’ मग ‘बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १२५व्या वर्षांतलं प्रदर्शन’ असे एकापेक्षा एक उपक्रम पुढल्या आठवडय़ापासून मुंबईत होत असल्यानं मुंबईबाहेर राहणाऱ्यांनीही तारखांकडे लक्ष ठेवावंच. पण त्याआधी चालू आठवडय़ात सुरू असणाऱ्या कला-प्रदर्शनांमध्येही भरपूर पाहण्यासारखं आहे. यापैकी काही प्रदर्शनं पाहताना जरा विचार केलात, थोडी माहिती घेतलीत, डोळे उघडे ठेवलेत, योग्य प्रश्न विचारलेत तर तुम्हाला ‘कलेचा उच्च कोटीचा अनुभव’ म्हणतात, तसा अनुभव देऊ शकणारी ही प्रदर्शनं आहेत. चित्रं पाहण्यासाठी, त्यांचे संदर्भ समजावून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो. यावर जुने लोक म्हणतात- ‘‘शाब्दिक संदर्भ कशाला समजून घ्यायचे? चित्रानंच बोलावं की!’’ हे म्हणणं काही प्रमाणात बरोबर आहे, पण केव्हा? जर चित्रकाराची (किंवा दृश्यकलावंताची) दृश्य-भाषा जशी कलाशाळेत शिकवतात तशीच किंवा त्यापेक्षा थोडीफारच निराळी असेल तेव्हा! आजचा कलावंत स्वत:ची दृश्यभाषा जर शोधू पाहतो आहे, तर त्या शोधाच्या कुठल्या तरी टप्प्यावर त्याला (/तिला) अवघी काही मिनिटं पाहून – म्हणजे ती दृश्यभाषा ‘ओझरती ऐकून’ आपण म्हणणार- ‘‘काही कळत नाही बुवा हे असं कशाला केलंय ते!’’ असं आपलं होऊ नये, कुणाच्या तरी भाषेशी आपण इतकं मुजोरपणे वागू नये, यासाठी आपण आपल्या – शब्दांच्या – भाषेतून त्या-त्या कलावंतांनी घडवलेल्या दृश्यभाषेबद्दल जाणून घ्यायला काय हरकत आहे?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा