पालिका निवडणुकीसाठी शिवाजी पार्कवर सभा घेऊ देण्यास नकार दिल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या अवमान याचिकेप्रकरणी उच्च न्यायालयाने राज यांना सोमवारी नोटीस बजावली.
अॅड्. एजाज नक्वी यांनी राज यांच्याविरुद्ध केलेल्या अवमान याचिकेवर न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने राज यांच्यासह राज्य सरकारला नोटीस बजावत चार आठवडय़ांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.
याचिकेवरील सुनावणीसाठी अॅड्. नक्वी वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने यांनी राज यांच्याविरुद्धची ही अवमान याचिका सुरुवातीला फेटाळून लावली होती. परंतु नक्वी यांनी पुन्हा ती नोंदवून घेण्याची विनंती केल्याने न्यायालयाने पुन्हा सुनावणी घेतली होती. तसेच केंद्रीय विधी व न्याय मंत्रालय तसेच प्रसारण मंत्रालयाला नोटीस बजावत उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. परंतु राज यांना नोटीस बजावण्यात आली नव्हती. सोमवारच्या सुनावणीत न्यायालयाने राज यांच्यासह राज्य सरकारला नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.
राज ठाकरे यांना नोटीस
पालिका निवडणुकीसाठी शिवाजी पार्कवर सभा घेऊ देण्यास नकार दिल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या अवमान याचिकेप्रकरणी उच्च न्यायालयाने राज यांना सोमवारी नोटीस बजावली. अॅड्. एजाज नक्वी यांनी राज यांच्याविरुद्ध केलेल्या अवमान याचिकेवर न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
First published on: 18-06-2013 at 02:00 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay hc issues notice to raj thackeray over contempt petition