जोगेश्वरी येथील झोपड्यांवरील पाडकाम कारवाईला स्थगितीस नकार

मुंबई : आठमुठ्या झोपडीधारकांमुळे पुनर्वसनाला विलंब नको, असे नमूद करून जोगेश्वरी येथील १२ चौरस मीटर परिसरातील झोपड्यांवरील पाडकाम कारवाईस स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नुकताच नकार दिला.

या झोपड्यांवरील पाडकाम कारवाई झोपडीधारकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे थांबली आहे. परिणामी पुनर्वसनासाठी आधीच झोपड्या रिकाम्या करून इतरत्र राहण्यास गेलेल्या अन्य झोपडीधारकांवर अन्याय होत आहे. ही बाब लक्षात घेता आडमुठ्या झोपडीधारकांना पाडकाम कारवाईपासून दिलासा देता येणार नाही, असे न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना दिलासा नाकारला स्पष्ट केले.

jewellery worth two lakh stolen from woman at swargate st bus depot
दिवाळीत एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट; स्वारगेट एसटी स्थानकात महिलेकडील दोन लाखांचे दागिने लंपास
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Over 150 prisoners in the state will be released from jail
राज्यातील दीडशेवर कैद्यांची होणार कारागृहातून सुटका; नागपूर आणि पुण्यातील…
Pune redevelopment old buildings, Pune old buildings, Stalled redevelopment old buildings pune,
पुणे : जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास, अरुंद रस्ते कुठे आहेत हे प्रश्न !
job Pune Municipal Corporation, people left job Pune Municipal Corporation, Pune Municipal Corporation news,
पुणे : पालिकेच्या नोकरीला ७१ जणांनी केला रामराम, नक्की काय आहे प्रकार !
Pimpri, Mantri Awas Yojana Rawet, Rawet latest news,
पिंपरी : रावेतमधील पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरांसाठी आणखी प्रतीक्षा; वाचा काय आहे कारण?
The children ran away from the juvenile reformatory Nagpur news
नागपूर: बालसुधारगृहातून मुलांनी काढला पळ; सुरक्षारक्षकानेच केली मदत…
girl abducted and gang tortured Amravti news
अमरावतीत तरूणीचे अपहरण करून सामूहिक अत्‍याचार…

हेही वाचा >>> दहिसर व मालाड येथे दोन अपघातात तिघांचा मृत्यू; मृतांमध्ये दोन लहान मुलींचा समावेश

झोपड्यांवरील पाडकाम कारवाईसाठी त्या रिकाम्या करण्याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्रे (सुधारणा, मंजुरी आणि पुनर्विकास) कायद्यांतर्गत झोपडीधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्या विरोधात ११ झोपडीधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर नुकतीच सुनावणी झाली. त्यावेळी आपल्या झोपड्यांचे सर्वेक्षण झाले नाही, असा दावा याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला. परंतु, झोपड्यांचे सर्वेक्षण झाल्याचे याचिकाकर्त्यांनी याचिकेतच मान्य केल्याकडे लक्ष वेधून याचिकाकर्ते आता खोटा दावा करत असल्याचे न्यायालयाने सुनावले. किंबहुना, याचिकाकर्त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून झोपड्या रिकाम्या केलेल्या नाहीत. त्यांच्यामुळे झोपड्यांवरील पाडकाम कारवाई थांबली आहे. झोपड्या रिकाम्या करणाऱया झोपडीधारकांबाबत याचिकाकर्ते एवढे बेफिकीर असणे अनाकलनीय आहे. स्वत:च्या हितापुढे त्यांन सामुदायिक हित दिसत नसल्याची टीकाही न्यायालयाने केली.

हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेच्या प्रसुतीगृहातील प्राणवायू पुरवठा सुधारणार; नवीन गॅसवाहिनी बसवण्याचा निर्णय

या प्रकल्पातील २७२ झोपडीधारकांपैकी ९० जण पुनर्वसनासाठी पात्र ठरले आहेत तर १८० झोपडीधारकांचा पुनर्वसन प्रकल्पाला विरोध असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. परंतु, झोपड्यांचे सर्वेक्षण झाले आहे. शिवाय, पुनर्वसनाच्या कारणास्तव आधीच झोपड्या सोडून गेलेल्यांचाही विचार व्हायला हवा. त्यामुळे पुनर्विकास प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा आणि झोपड्या सोडून गेलेल्यांना पुनर्वसनातील घरे लवकर ताब्यात मिळावी, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा नाकारताना म्हटले. दुसरीकडे, याचिकाकर्त्यांना सहा महिन्यांच्या आगाऊ भाड्याची रक्कम दिली जाणार असून ते पुनर्वसानासाठी अपात्र ठरले तरी ही रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाणार नाही, असे विकासकाच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर विशेषत: न्यायालयाच्या पवित्र्यानंतर विकासकाने दिलेला प्रस्ताव स्वीकारण्यास तयार असल्याचे याचिकाकर्त्यांनी अखेर न्यायालयाला सांगितले.