मुंबई : प्रवांशाला सहा रुपये परत न केल्याच्या आरोपाप्रकरणी २६ वर्षांपासून बडतर्फ असलेल्या रेल्वेच्या कारकूनाला कोणताही दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. विशेष म्हणजे, दक्षता पथकानेच संबधित प्रवाशाला या अधिकाऱ्याकडे तिकीट काढण्यासाठी पाठवले होते. राजेश वर्मा असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कोकण, पुणे, औरंगाबादमधील १० हजार घरांसाठी ऑक्टोबरमध्ये सोडत

कुर्ला टर्मिनस येथील संगणकीकृत बुकिंग कार्यालयात ३० ऑगस्ट १९९७ रोजी ते काम करत होते. त्यावेळी, रेल्वे पोलिसांतील हवालदार दक्षता पथकाच्या सांगण्यावरून वर्मा कार्यरत असलेल्या तिकीट खिडकीजवळ गेला आणि त्याने कुर्ला टर्मिनस ते आरा असे तिकीट देण्याची मागणी त्यांच्याकडे केली. तिकीट भाडे २१४ रुपये होते व हवालदाराने ५०० रुपयांची नोट वर्मा यांना दिली. त्यामुळे, वर्मा यांनी या हवालदाराला २८६ रुपये परत करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी केवळ २८० रुपये या हवालदाराला परत केले. काही वेळाने, दक्षता पथकाने वर्मा कार्यरत होते त्या तिकीट खिडकीची तपासणी केली. त्यावेळी, त्यांच्याकडील रेल्वे रोखीत ५८ रुपये कमी असल्याचे आढळून आले. त्याचवेळी मागे ठेवलेल्या कपाटातून ४५० रुपयांची रक्कम दक्षता पथकाने जप्त केली. प्रवाशांकडून जास्त भाडे आकारून गोळा केलेली ही रक्कम होती आणि आर्थिक लाभ घेतल्याचे लपवण्यासाठी वर्मा यांनी ती कपाटात लपवली होती, असा दक्षता विभागाचा दावा होता.