मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिला युरोपला जाण्यास सीबीआयने केलेला विरोध उच्च न्यायालयाने शुक्रवारी योग्य ठरवला. तसेच, विशेष न्यायालयाने याबाबत दिलेला आदेश रद्द करून इंद्राणी हिच्या परदेशवारीस नकार दिला. इंद्राणीला परदेशात जाऊन काम करणे आवश्यक असल्याचे कोणतेही तार्किक कारणे विशेष न्यायालयाने तिची परदेशी जाण्याची मागणी मान्य करताना दिलेली नाहीत. तसेच, इंद्राणी हिचा अर्ज गुणवत्तेच्या आधारे मान्य करण्यात आल्याचे स्पष्ट करणारी टिप्पणीही विशेष न्यायालयाने केलेली नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या एकलपीठाने सीबीआयची याचिका योग्य ठरवताना नोंदवले. तसेच, इंद्राणीला पॉवर ऑफ ॲटर्नीद्वारे अथवा ऑनलाईन पद्धतीने भारतातूनच काही कामे करायची असल्यास सरकारने तिला सहकार्य करावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

हेही वाचा >>> नायर रुग्णालय विनयभंग प्रकरण : निलंबित डॉक्टराविरोधात आणखी १० विद्यार्थिनींच्या तक्रारी

ram jhula hit and run case
“तांत्रिक कारणांमुळे न्याय पराभूत होता कामा नये”, रितू मालू प्रकरणी सत्र न्यायालय म्हणाले…
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Separate compartment, senior citizens,
दोन वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा, एका मालडब्याचे ज्येष्ठांसाठीच्या डब्यात रूपांतर, रेल्वे प्रशासनाची उच्च न्यायालयाला माहिती
high court
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, न्यायिक अधिकाऱ्यांच्या नावेही पैशांची मागणी; उच्च न्यायालय प्रशासनाकडून प्रकाराची गंभीर दखल
High Court refuses to hear PIL seeking ban on use of DJ laser lights in Eid e Milad processions Mumbai news
ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत डीजे, लेझर दिव्यांच्या वापरावरील बंदीची मागणी; जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार
Supreme Court directs Sahara Group to deposit Rs 1000 crore
सहारा समूहाला १,००० कोटी जमा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश; मुंबई जमीन विकसित करण्यासाठी संयुक्त भागीदारीस परवानगी
panvel municipal corporation,
हरकतींसाठी महिन्याची मुदत द्या, पनवेल प्रारूप आराखड्याबाबत शेकापची महापालिकेकडे मागणी
Sheth Motishaw Lalbagh Jain Charity PIL in High Court
पर्युषण पर्वादरम्यान पशुहत्या, मांस विक्रीवर तात्पुरती बंदी घाला; मागणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका

विशेष सीबीआय न्यायालयाने १९ जुलै रोजी इंद्राणी हिला तीन महिन्यांसाठी अधूनमधून १० दिवसांसाठी युरोप (स्पेन आणि युके) प्रवास करण्याची परवानगी दिली होती. विशेष न्यायालयाचा हा आदेश कायद्याच्या दृष्टीने चुकीचा आणि मनमानी असल्याचा दावा करून तो रद्द करण्याच्या मागणीसाठी सीबीआयने वकील श्रीराम शिरसाट यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका केली होती. इंद्राणीवर खुनाचा गंभीर खटला सुरू असून तिच्यावर स्वतःच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यामुळे, तिला परदेशात जाण्यास परवानगी दिल्यास ती परतण्याची शक्यता कमी आहे, असा दावा सीबीआयने केला होता. सीबीआयच्या याचिकेवर शुक्रवारी निर्णय देताना न्यायमूर्ती चांडक यांच्या एकलपीठाने सीबीआयची याचिका योग्य ठरवून इंद्राणी हिला परदेश दौरा करण्यास नकार दिला.