SRA घोटाळा प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुंबई
उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना असे निर्देश दिले आहेत की या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करू नये. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किशोरी पेडणेकरांवर काय आरोप?

मुंबईच्या माजी महापौर तथा शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणींमध्ये भर पडली कारण किशोरी पेडणेकर यांच्यावर वरळी येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील सदनिका लाटल्याचा आरोप झाला. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदा घेत वेगवेगळ्या कागदपत्रांच्या आधारे हा आरोप केलेला आहे. याच आरोपाप्रकरणी आता किशोरी पेडणेकर यांच्यासह अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली. ‘किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात झोपडपट्टीवासीयांची घरे काबीज करण्याच्या आरोपाखाली ४२०, ४१९, ४६५, ४६८, ४७१ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,’ असे किरीट सोमय्या यांनी सांगितलं होतं.

किशोरी पेडणेकरांनी फेटाळले आरोप

किशोरी पेडणेकर यांच्यावर वरळी येथील गोमाता जनता एसआरएमध्ये ६ गाळे (सदनिका) लाटल्याचा आरोप आहे. या सदनिका वर्षानुर्षे पेडणेकर त्यांच्या ताब्यात आहेत, असा दावा केला जातो. तर दुसरीकडे किशोरी पेडणेकर यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. “दोन वर्षांपूर्वी सर्व माहिती दिलेली असतानाही वारंवार तीच कागदपत्रं दाखवून आरोप केला जातोय. मी कायदेशीर लढाई लढणार आहे, सत्य सर्वांना कळेल. आग नाही पण धूर काढण्याची पद्धत यांनी अवलंबली आहे. प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्यासह गेल्यानंतर गेल्यानंतर सगळे आरोप थांबले आहेत. त्यामुळे लोकांना सगळं माहिती आहे, असे स्पष्टीकरण किशोरी पेडणेकर यांनी याआधी दिलेले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court directs mumbai police to not file chargesheet against former mayor of mumbai city kishori pednekar in an alleged sra scam case scj