२००६ मधील मालेगाव स्फोटाप्रकरणी  निंष्पाप मुस्लिम तरुणांना गोवणाऱ्या राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.
याचिकादाराचा बॉम्बस्फोटातील मृतांशी वा जखमींशी किंवा आरोपींशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्याला अशी मागणी करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट करीत न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने मुस्लिम- ए- हिंद या संस्थेने केलेली याचिका फेटाळून लावली. तसेच या प्रकरणात आधी अटक झालेल्या मात्र नंतर एनआयए निर्दोष असल्याची पावती दिलेल्या आरोपींच्या दोषमुक्ततेच्या अर्जावर अद्याप खटला चालविणाऱ्या न्यायालयाने निकाल दिलेला नाही, असे नमूद करीत तपासाशी संबंधित ‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशीची मागणीही फेटाळून लावली.

Story img Loader