प्रदूषण नियंत्रण मंडळ व ‘लोकसत्ता’चा उपक्रम
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व लोकसत्ता यांच्या वतीने जागतिक तापमानवाढीच्या समस्येचा वेध घेणाऱ्या ‘ग्लोबल वॉर्मिग-व्याप्ती, आव्हान, मार्ग’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असून, त्याचे प्रकाशन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते केले जाणार आहे.
हा प्रकाशन समारंभ येत्या गुरुवारी (६ जून) सकाळी १०.३० वाजता येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात होणार आहे.जागतिक तापमानवाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिग या समस्येचा सर्वच अंगांनी घेतलेला वेध, आकर्षक छायाचित्रे व उत्तम मांडणी हे पुस्तकाचे वैशिष्टय़ आहे.
या समस्येचा इतिहास, त्याची सद्य:स्थिती, त्याचे विविध घटकांवर होणारे परिणाम, भविष्यात उभी राहणारी आव्हाने आणि त्यातून काढावयाचे मार्ग अशा महत्त्वाच्या विषयांवर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लेखकांचे लेख या पुस्तकात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा