उपनगरी रेल्वे स्थानकातील बूटपॉलिशच्या वाढीव दराला रेल्वेची मान्यता मिळाली आहे. पश्चिम रेल्वेवर दोन वर्षांपूर्वीच वाढलेले दर आता मध्य रेल्वेवरही लागू झाले आहेत. साध्या आणि क्रिम पॉलिशसाठी आता अनुक्रमे पाच व सात रुपये मोजावे लागत आहेत. स्थानकांवरील बूटपॉलिश दरांना रेल्वेचा वाणिज्य विभाग मान्यता देतो. पाच वर्षांपूर्वी बूटपॉलिशच्या सहा संघटनांनी दरवाढीची मागणी रेल्वे बोर्डाकडे केली होती. पश्चिम रेल्वेने दोन वर्षांपूर्वीच दर वाढविले मात्र मध्य रेल्वेवर वेगवेगळे दर होते.    

Story img Loader