लोकसत्ता खास प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई: ‘ओमेगा’ या नामांकीत विदेशी कंपनीच्या घड्याळांचा परस्पर अपहार करणाऱ्या ४७ वर्षीय कर्मचाऱ्याला बोरिवली पोलिसांनी ४८ तासांत अटक केली. आरोपीने सुमारे २७ लाख रुपयांच्या घड्याळांचा अपहार केला होता. त्यातील सुमारे २० लाख रुपयांची घड्याळे हस्तगत करण्यात बोरिवली पोलिसांना यश आले आहे.
बोरिवली येथील स्वीस पॅराडाईज या घड्याळाच्या शोरुममध्ये काम करणारा कर्मचारी सुरेशभाई बाबुभाई राठोड (४७) याच्याकडे ओमेगा कंपनीची चार वेगवेगळी महागडी घड्याळे ग्राहकांना वितरीत करण्यासाठी देण्यात आली होती. त्याने घड्याळांचे वितरण न करता ती स्वतः कडेच ठेवली आणि तो पसार झाला होता. याप्रकरणी बोरिवली पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
हेही वाचा… ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग: एमएमआरडीए नेमणार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार
वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश कदम व त्यांच्या पथकाने याप्रकरणी तपासाला सुरूवात केली. आरोपी राठोडचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला असता त्याचा कोणताही थांगपत्ता लागत नाही. अखेर तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी बोरिवली पश्चिम येथील गोराई परिसरातील हॉटेलमधून त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी त्याची चौकशी केली असता त्यानेच घड्याळांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले. अखेर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली.
हेही वाचा… “मोदींनी चिनी राष्ट्राध्यक्षांना अहमदाबादेत आणून कितीही ‘झोके’ दिले तरी…”; ठाकरे गटाचा हल्लाबोल
आरोपीकडून तीन महागडी घड्याळे हस्तगत करण्यात आली असून त्यांची किंमत १९ लाख रुपये आहे. आरोपीने एकूण २६ लाख ८१ हजार रुपयांच्या घड्याळांचा अपहार केला आहे. आरोपीने यापूर्वीही घडाळांचा अपहार केला आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.