मुंबई : रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) जवान चेतन सिंह याने जयपूर – मुंबई एक्स्प्रेसमध्ये केलेल्या गोळीबार प्रकरणाचा घटनाक्रम जाणून घेण्याचे काम सध्या बोरिवली रेल्वे पोलीस करीत असून त्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरा आणि प्रत्यक्षदर्शींची मदत घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी आतापर्यंत १०० जणांकडून माहिती घेण्यात आली आहे. याशिवाय चेतनच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>> विक्रोळीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी अटकेत

Gujarat man on FBI 10 Most Wanted Fugitives list
Crime News : FBIच्या ‘१० मोस्ट वॉन्टेड’ यादीत गुजराती व्यक्तीचं नाव; माहिती देणाऱ्याला मिळणार ‘इतक्या’ डॉलर्सचं बक्षीस
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Talbid police have arrested the fugitive gangsters from Ahmedabad and left for Ahmedabad.
अहमदाबादमधून फरारी सराईत पाच गुंडांना कराडजवळ अटक, तळबीड पोलिसांची कारवाई
Police Suspects Saif Ali Khan House Helper knew Attacker
हल्लेखोराला ओळखत होती सैफ अली खानची मदतनीस, पोलिसांना संशय; दोन तासांच्या CCTV फुटेजमध्ये…
Bavdhan , pistols, cartridges , koyta ,
पिंपरी : बावधनमध्ये तीन पिस्तूल, पाच काडतुसे, सहा कोयते जप्त
navi mumbai firing
नवी मुंबई : सानपाडा गोळीबार प्रकरणी एक अटक
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
police detained criminal and beat him on street who threatened to beat journalists
Video : डोंबिवलीत दहशत माजविणाऱ्या भाईला भर रस्त्यात पोलिसांचा चोप

चेतन सिंहने केलेल्या गोळीबारात आरपीएफ अधिकारी टिकाराम मीना (५८), अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसैन भानपूरवाला (४८), अख्तर अब्बास अली (४८) यांच्यासह हैदराबादच्या नामपल्ली विभागातील रहिवासी सैयद सैफुल्लाह यांचा मृत्यू झाला. गोळीबारामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत चौकशी सुरू आहे. त्यासाठी सूरतपासून अगदी अटक होईपर्यंत संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न बोरिवली रेल्वे पोलीस करीत असून त्यासाठी रेल्वेतील, रेल्वे स्थानकांवरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेण्यात येत आहे. तसेच प्रत्यक्षदर्शी व तेथे उपस्थित व्यक्तींकडूनही घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी सुमारे १०० हून अधिक व्यक्तींकडून माहिती घेण्यात आली आहे. त्यात आरपीएफ जवान व इतर कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

हेही वाचा >>> “काहींना सहवास लाभूनही बाळासाहेबांचे संस्कार…”, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका!

आरपीएफ हवालदारांची नियतकालिक वैद्यकीय तपासणी (पीएमई) प्रणाली आहे. पीएमईमध्ये चेतन सिंहच्या आजारपणाबाबत काहीही माहिती नसल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे. तसेच चेतन सिंह याच्याकडूनही याबाबत कुठली माहिती देण्यात आली नाही. तो वैयक्तिक पातळीवर काही उपचार घेत असल्यास त्याची अधिकृत नोंद नाही. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्याबाबत माहिती दिली नाही, असा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे. त्याबाबत माहिती घेण्यासाठी चेतनच्या कुटुंबियांचाही जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader