मुंबईः पश्चिम रेल्वेवरील जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार करून चौघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) बडतर्फ जवान चेतन सिंह यालाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मृतांचे नातेवाईक करत आहेत. वर्ष उलटले तरी त्या घटनेची भीती अद्यापही मनात असल्याचे मृत सैय्यद सैफुद्दीनचा भाऊ युनुस सैय्यद याने व्यक्ती केली.

याप्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून खटला अद्याप प्रलंबीत आहे. जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये ३१ जुलै, २०२३ ला झालेल्या गोळीबाराच्या घटनेत आरोपी चेतन सिंहने विरोधात आरपीएफ अधिकारी टिकाराम मीना (५८), अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसैन भानपूरवाला (४८), अख्तर अब्बास अली (४८) यांच्यासह हैदराबादच्या नामपल्ली विभागातील रहिवासी सैयद सैफुल्लाह यांच्या हत्येचा आरोप आहे. याप्रकरणी चेतन सिंहविरोधात भादंवि कलम ३०२, १५३ अ, ३४१, ३४२, ३६३ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५, २७ व भारतीय रेल्वे कायदा कलम १५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेला वर्ष पूर्ण झाले असतानाही कुटुंब अद्याप त्या धक्क्यापासून सावरले नसल्याचे युनुस सैय्यद यांनी सांगितले. घटनेचा आघात कुटुंबावर एवढा भयंकर आहे की, मला स्वतःला कुठेही जाताना भीती वाटते. कुटुंबाचा आधार असलेल्या व्यक्तीची निर्दयीपणे हत्या करणाऱ्या चेतन सिंहला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तोच खऱ्या अर्थाने आमच्यासाठी न्याय असेल, अशी प्रतिक्रिया युनूस यांनी व्यक्त केली.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?

हेही वाचा – मुंबई : जी.टी. वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सज्ज, अद्ययावत सोयी-सुविधा पुरवण्याचे प्रयत्न

हेही वाचा – Central Railway : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ स्थानकापर्यंतच लोकल धावणार; ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा

याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी १०९७ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यात ३९ साक्षीदारांचा समावेश आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी पुंगळ्या जप्त केल्या होत्या. तसेच शवविच्छेदनात मृतांच्या शरिरातूनही काही काडतुसे जप्त करण्यात आली. रायफलसह त्याही बॅलेस्टिक अहवालासाठी पाठवण्यात आल्या आहेत. सिंह याच्याकडे सेमी ऑटोमॅटिक असॉल्ट रायफल होती. त्याच्याकडे २० काडतुसे होती. त्यातील १२ गोळ्या त्याने घटनेच्या दिवशी झाडल्या होत्या. सिंहच्या रायफलमधील मॅगझीनमधून आठ जिवंत काडतुसे सापडली होती. ती जप्त करण्यात आली आहेत. रेल्वे पोलिसांना रेल्वेतील एक सीसीटीव्ही चित्रीकरण सापडले आहे. त्यात आरोपी दिसत आहे. तसेच चेतन सिंहच्या हल्ल्यानंतर काही प्रवाशांनी दूरध्वनी केले होते. त्याच्या रेकॉर्डिंगमध्ये गोळ्यांचा आवाज ऐकू येत आहेत. याशिवाय हत्येनंतर चेतन सिंहची एक ध्वनी चित्रफीत वायरल झाली होती. ती चेतनचीच असल्याचे न्यायवैधक प्रयोगशाळेतील चाचणीत स्पष्ट झाले आहे. या सर्व पुराव्यांचा आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. आरोपी चेतन सिंह सध्या अकोला कारागृहात असून त्याच्याविरोधात खटला प्रलंबित आहे.