मुंबई : पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरार दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाआड येत असलेल्या खारफुटीच्या जमिनीवर रेल्वेची कामे करण्यास राज्य सरकारने मुंबई रेल्वे विकास महामंडळाला (एमआरव्हीसी) तत्वत: मान्यता दिली. १२.७८०८ हेक्टर खारफुटी जमिनी असून त्यावर रेल्वे कामे करण्यास मान्यता मिळाल्याने रेल्वेचे जाळे आणखी विस्तारणार आहे.

वाढत्या गर्दीचा लोंढा विभाजित करण्यासाठी रेल्वे मार्गिका वाढवण्यावर भर दिला जात आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी-३ अ) अंतर्गत पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरारदरम्यान २६ किमीच्या पाचव्या-सहाव्या मार्गाचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी २,१८४.०२ कोटी रुपये मंजूर झाले असून डिसेंबर २०२७ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे एमआरव्हीसीचे लक्ष्य आहे. सध्या या प्रकल्पामधील बाधित झाडांची वृक्षतोड करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वृक्षतोडीचे प्रस्ताव आणि ठाणे आणि पालघरचे जिल्हाधिकारी यांना भूसंपादनाचे प्रस्ताव सादर करून प्रशासकीय प्रक्रिया केली जात आहे. तसेच पादचारी पूल, फलाटे व त्यावरील छताबाबत निविदा प्रक्रिया सुरू आहे.

local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई
Dombivli railway station work
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट एक-ए वरील सरकता जिना, उतार वाट रेल्वे पुलाच्या कामासाठी बंद

हेही वाचा >>>मराठय़ांचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी ४०० कोटी; मागासवर्ग आयोगाची राज्य सरकारकडे मागणी 

प्रकल्पामधील एकूण ४७ बांधकामे हटवण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन रेल्वे मार्ग तयार करण्यास मुबलक जागा तयार होईल. सध्या मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहावी मार्गिका २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच २०२७ मध्ये बोरिवली ते विरार पाचवी आणि सहावी मार्गिका तयार झाल्यास, लोकल, रेल्वेगाडय़ांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार होतील, असा विश्वास एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला. या प्रकल्पाआड येणाऱ्या खारफुटीच्या जमिनीवर कामे करण्यास पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून एमआरव्हीसीला तत्वत: मान्यता मिळाली आहे.

या प्रकल्पाच्या रचनेला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे ड्रोन सर्वेक्षण आणि संरेखन पूर्ण झाले आहे. तसेच ५ प्रकल्प पत्रके (प्रोजेक्ट शीट), ३ मोठे आणि १० लहान पुलाच्या रेखाचित्रांना मंजुरी मिळाली आहे. तसेच पायाभूत कामाला सुरुवात डिसेंबर २०२३ पासून केली जाणार आहे. – सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, एमआरव्हीसी