महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारला गेली १५ वर्षे आशीर्वाद दिला आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवीत राज्य सरकारने आरोग्य, शिक्षण, उद्योग, जलसिंचन यांसारख्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऐरोली येथे झालेल्या अन्नसुरक्षा योजनेच्या राज्यव्यापी शुभारंभ कार्यक्रमात केले.
आघाडी सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत, पण विरोधक त्या विषयी  खोटे बोलत आहेत. त्यांच्या प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच कार्यक्रमात केले. त्यामुळे दोन्ही काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगूल वाजवल्याचे चित्र होते. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कोणतेही राजकीय वक्तव्य न करता ही योजना यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आग्रहामुळे झाल्याची कबुली दिली.
केंद्र सरकारने अन्नसुरक्षा विधेयक मंजूर केल्यानंतर अडीच महिन्यांनंतर राज्य सरकारने देशातील पहिल्या योजनेचा आजपासून शुभारंभ पवार यांच्या हस्ते केला. राज्यातील सात कोटी १७ हजार गरीब नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे.

Story img Loader