मुंबई : मुंबईतील उड्डाणपुलांवर लवकरच बोगनवेलचा साज चढणार आहे. मुंबईतील २० उड्डाणपुलांवरील दुभाजकांमध्ये तब्बल दोन हजार फुलांच्या कुंड्या ठेवण्यात येणार आहेत. या कुंड्यांमध्ये लवकरच बोगनवेल बहरणार आहेत.

मुंबईतील प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि नयनरम्य व्हावा यासाठी उद्यान विभागाने सर्वेक्षण करून २० उड्डाणपुलांची निवड केली आहे. उड्डाणपुलांची निवड करताना, तसेच दुभाजकांमध्ये बोगनवेलीची फुलझाडे लावल्यानंतर वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या उड्डाणपुलांवरील दुभाजक अधिकाधिक रुंद असतील, अशाच पुलांची निवड केली आहे.

हेही वाचा – मेट्रो ६ मार्गिकेतील आरे कारशेडच्या कामासाठी दोन निविदा सादर, लवकरच निविदा अंतिम करणार

बोगलवेलीची निवड का ?

वाहनधारकास उड्डाणपुलांवरील प्रवास प्रसंगी रुक्ष वाटू शकतो. तसेच उन्हाच्या झळादेखील उड्डाणपुलावर अधिक लागतात. त्यामुळे उद्यान विभागाने या पुलांवरील दुभाजक पाना-फुलांनी सजविण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून प्रवास सुसह्य होईल. विशेष म्हणजे बोगनवेल कमी पाण्यात वाढते आणि अधिक काळ टवटवीत राहते. त्यामुळे उद्यान विभागाने बोगनवेलीच्या पर्यायाची निवड केली आहे.

हेही वाचा – मध्यान्ह भोजनातील अंड्याला धार्मिक संघटनांचा विरोध, सरकारने घेतला ‘हा’ नवा निर्णय

या उड्डाणपुलांची निवड

के पूर्व विभागातील पश्चिम द्रुतगती महामार्ग, आर उत्तर विभागातील जोडरस्ता (लिंक रोड), एच पूर्व विभागातील वांद्रे कुर्ला संकुलाकडून (बीकेसी) वाकोल्याच्या दिशेला जाणारा उड्डाणपूल, वांद्रे पश्चिम विभागातील मीलन उड्डाणपूल, लालबाग उड्डाणपूल, मालाडमधील पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगावमधील पश्चिम द्रुतगती महामार्ग, बोरिवलीतील राष्ट्रीय उद्यान उड्डाणपूल, मागाठाणे उड्डाणपूल, सुधीर फडके उड्डाणपूल, कुर्ला येथील सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता उड्डाणपूल, राजयोगिनी ब्रह्मकुमारी ब्रुजिंद्र दादीजी उड्डाणपूल (शीव पूल), नंदलाल डी. मेहता उड्डाणपूल (माटुंगा उड्डाणपूल), नाना जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपूल (दादर उड्डाणपूल), एम पूर्व विभागातील पूर्व मुक्त मार्ग, गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता उड्डाणपूल, शीव-पनवेल महामार्गावरील उड्डाणपूल, मुलुंडमधील पूर्व द्रुतगती महार्गावरील उड्डाणपूल, शीव – वांद्रे जोड रस्ता, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, घाटकोपरमध्ये पूर्व द्रुतगती महार्गावरील उड्डाणपूल, चेंबूरमध्ये पूर्व मुक्त मार्ग, सुमन नगर जंक्शन ते चंदननगर वाहतूक दिव्यांपर्यंतचा भाग.

Story img Loader