PM Narendra Modi mumbai visit वांद्रे कुर्ला संकुलातील सभास्थळी मुंबई पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. सभास्थळी सामान्याना सोडण्यात येणारे प्रवेशद्वार, अति महत्त्वाच्या व्यती आणि पत्रकारांच्या प्रवेशद्वाराबरोबरच ठिकठिकाणी मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. त्याचवेळी दुपारी सव्वातीनच्या सुमारास १३० पुरुष आणि महिला खासगी बाउंसरही दाखल झाले. त्यांना पाहून पोलिसही अवाक झाले.

हेही वाचा >>> Narendra Modi Mumbai visit : पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर; वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयांना दुपारनंतर सुट्टी जाहीर

मुंबई महानगरपालिकेने या बाऊन्सरना पाचारण केले होते. मात्र यापैकी बहुतांश बाऊन्सर काळ्या पोशाखात होते, तर काहींनी निळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. पंतप्रधानाची सभा असल्याने काळ्या रंगाचा पोशाख परिधान केलेल्या बाउंसरना सभास्थळी प्रवेश देण्यास पोलिसांनी नकार दिला आणि पुन्हा माघारी फिरण्याची सूचना केली. निळ्या रंगाचा पोशाख परिधान केलेले बाउंसर थांबू शकतील, असे उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बाऊन्सरची नियुक्ती करणाऱ्या अधिकाऱ्याला सांगितले. त्यामुळे काळ्या रंगाचा पोशाख परिधान केलेले बाऊन्सर माघारी परतले.

Story img Loader