शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पाळण्यात आलेल्या ‘मुंबई बंद’बाबत दोन तरूणींनी फेसबुकवर प्रतिक्रीया नोंदविल्याचा वाद थंड होण्याची चिन्ह दिसत असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूध्द फेसबुकवर अपमानकारक लिहिल्याची घटना समोर आली आहे. सुनील विश्वकर्मा (१९) या मुलाने ही प्रतिक्रिया नोंदवली असून, विशेष म्हणजे सुनील देखिल पालघर येथीलच रहिवासी आहे.
या संदर्भात माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी सुनील विश्वकर्मा याला पोलिस स्टेशनमध्ये नेले आहे. मागील प्रकरणात मुलींना अटक केल्यावरून सदर पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, त्यामुळे या प्रकरणी पोलिसांना कायदेशीर मदतीच्या प्रतिक्षेत असून पोलिसांनी अद्याप त्या मुलावर कोणतीच कारवाई केलेली नाही.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा