मुंबई : घराबाहेर खेळत असताना उघड्या विद्युत वायरला स्पर्श होऊन एका सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मुलुंड येथे घडली आहे. याबाबत मुलुंड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे. अर्णव भंडारी (वय ६) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – शिवीगाळ केली म्हणून जाब विचारल्याने केली हत्या

हेही वाचा – परराज्यातील औषधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एफडीएचे संकेतस्थळ

अर्णव मुलुंडच्या शंकर टेकडी परिसरात कुटुंबियांसह राहात होता. रविवारी दुपारी चारच्या सुमारास तो घराबाहेर मांजरीशी खेळत होता. तेथे विजेच्या काही उघड्या तार होत्या. त्यातील एका उघड्या तारेला त्याचा स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जोरात धक्का लागला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या वडिलांनी तत्काळ त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे उपचार न झाल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला होता. याबाबत मुलुंड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे.