Mumbai Crime : मुंबई पोलिसांनी नागपाडा भागातल्या २१ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. सोहेल खान असं या तरुणाचं नाव आहे. बलात्कार, शोषण, लैंगिक छळ या गुन्ह्यांच्या आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली आहे. सोहेल खानने त्याच्याच प्रेयसीला घरी सोडतो असं सांगितलं, तिला हॉटेलवर नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.
पीडित तरुणीने पोलिसांना काय सांगितलं?
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीप्रमाणे, सोहेल खान या तरुणाने त्याच्या प्रेयसीला कॉलेजमध्ये गाठलं. त्यानंतर तिला सांगितलं की मी तुला घरी सोडतो. मात्र तिला घरी सोडण्याऐवजी तो त्याच्या प्रेयसीला भायखळा येथील हॉटेलवर घेऊन गेला. तिथे त्याने तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवले. या तरुणीनेच त्याच्यावर हा आरोप केला आहे की तिच्या प्रियकराने तिच्या इच्छेविरोधात तिच्याशी शरीर संबंध (Mumbai Crime) ठेवले. तरुणीच्या तक्रारीनंतर बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या दोघांचं लवकरच लग्न होणार होतं
या मुलीने असंही सांगितलं आहे की आम्ही प्रियकर प्रेयसी आहोत, आमच्या नात्याबद्दल घरातल्या लोकांनाही माहीत आहे. त्यांनी आमच्या लग्नालाही होकार दिला आहे. मला सोहेलने हॉटेलवर नेलं आणि बळजबरी करु लागला. शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी त्याने माझ्यावर दबाव टाकला. माझ्या आई वडिलांनी त्याला हे सांगितलं होतं की तो आजारातून बरा झाल्यावर त्याच्याशी माझं लग्न लावून देतील. तरीही त्याने हे कृत्य ( Mumbai Crime) केलं.
नागपाड्यात नेमकं काय झालं?
महाविद्यालयीन तरुणी आणि सोहेल खान यांचं लग्न होणार होतं. मात्र या तरुणीने पोलिसात प्रियकर सोहेल खान विरोधात तक्रार दाखल केली आहे. कॉलेजमधून घरी सोडतो असं सांगत त्याने हॉटेलवर नेलं आणि बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित ( Mumbai Crime) केले. मी नकार दिला तरीही त्याने ऐकलं नाही ( Mumbai Crime) असं या तरुणीने सांगितलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
आरोपीच्या प्रेयसीनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत बलात्कार, विनयभंग आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रेयसीच्या तक्रारीनुसार, सोहेल खानने मुलीला तू माझं ऐकलं नाहीस तर तुला कॉलेजमधून काढून टाकायला सांगेन असं तिला सांगितलं. त्यानंतर घरी सोडतो म्हणाला आणि तिला भायखळ्यातील एका हॉटेलमध्ये नेलं. त्यानंतर तिची इच्छा नसताना, ती नकार देत असताना तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. असं या तरुणीनेच पोलिसांना सांगितलं आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सोहेल खानला बलात्कार, विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd