Taj Hotel Viral Video : मुंबईत एकदा तरी फिरायला जावं, असं परराज्यात राहणाऱ्या अनेकांना वाटतं. काही माणसं नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने आपलं गावं सोडून मुंबईत राहतात. पण जगातील उच्चभ्रू शहरांपैकी एक असलेलं मुंबई शहर कधीही पाहिलं नाही त्यांना मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर फिरायला खूप आवडतं. समुद्र किनाऱ्यावर असलेल्या स्टॉल्सवर फास्ट फूड, पाणीपूरीवर अनेक जण ताव मारतात. पण त्याच किनाऱ्याजवळ उभ्या असलेल्या पंचतारांकीत हॉटेलच्या इमारतीत जाऊन एकदा तरी पंचपक्वानाचे पदार्थ खावे, अशी अनेकांची इच्छा असते. एका तरुणानेही ताज हॉटेलमध्ये प्रवेश करुन असंच काहीसं केलं. पण जेवण झाल्यानंतर बिल देण्यासाठी आलेल्या तरुणाने असं काही केलं, जे पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

आताच्या डिजीटल जमान्यात खूप लोक पैशांचा व्यवहार कार्ड किंवा इंटरनेट बॅंकिंगच्या माध्यमातून करतात. हॉटेलच्या जेवणाचं बिलही रोख रक्कमेत देण्याचं प्रमाण कमी होताना दिसत आहे. पण सिद्धेश लोकरे या तरुणानं कमालच केली आहे. ताज हॉटेलमध्ये जेवणावर ताव मारल्यानंतर तरुणानं काऊंटरवर कॅश नाही तर चक्क चिल्लर देऊन बिल दिलं आहे. चिल्लरने बिल देण्याचा अनुभव त्याने कॅमेरात कैद केला असून व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओला १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
rasha thadani 12 th studies on set
Video : राशा थडानीने ‘आझाद’च्या सेटवर केला बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास; व्हायरल व्हिडीओत अभिनेत्री म्हणाली, “१० दिवसांत…”
Anand Mahindra reacts to parent hack video
Anand Mahindra: अहो, थांबा! परदेशी नागरिकाचा ‘जुगाड’ पाहून आनंद महिंद्रा झाले थक्क; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाले, ‘आमचा मुकुट…’
Mother love Viral Video
‘शेवटी त्यालाही कळली आईची माया…’ मुलाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या आईची ट्रेन गार्डने केली मदत; हृदयस्पर्शी VIDEO पाहून व्हाल भावूक

नक्की वाचा – Viral Video : ‘द नाईट मॅनेजर’ वेब सीरिजमध्ये वकिलाच्या भूमिकेत विजय मल्ल्या? नेटकरी म्हणाले, ‘यालाच वकिलाची गरज…’

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, बिल देणं महत्वाचं आहे. तुम्ही सुट्टे पैसे किंवा डॉलर देऊनही बिल देऊ शकता. सुट बूट घालून हा तरुण ताज हॉटेलमध्ये जेवणाची मेजवानी साजरी करण्यासाठी प्रवेश करत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पिझ्झा आणि मॉकटेल ऑर्डर केलेल्या तरुणाने चक्क चिल्लर देऊन बिल दिल्यानं सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे. हा तरुण खिशातून एक पाऊच काढून त्यात असलेली चिल्लर मोजताना व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून या तरुणाने लोकांना जबरदस्त संदेश दिला आहे.

Story img Loader