संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सापडलेल्या सरला अहिरे या तरुणीच्या हत्येप्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी तिचा प्रियकर प्रवीण तळवटकर याला अटक केली. सरलाने लग्नाचा तगादा लावल्यानेच प्रियकराने हत्या केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यांपासूनच हत्येचा कट रचून तो पोलिसांची दिशाभूल करत होता. मात्र या गुन्ह्य़ाचा तपास करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत वरळीकर यांनी हुशारीने या गुन्ह्य़ाची उकल केली.
कामावर जाते, असे सांगून सरला घरातून निघाली होती आणि बेपत्ता होती. राष्ट्रीय उद्यानात एका तरुणाच्या मोटारसायकलीवर बसून जात असतानाचे सीसीटीव्ही चित्रणही पोलिसांना मिळाले होते. याप्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी तिचा विवाहित प्रियकर प्रवीण तळवटकर याला अटक केली. त्याने फिरायला नेण्याच्या बहाण्याने सरलाला उद्यानात बोलावले. संध्याकाळी पाचच्या सुमारास डेपीनच्या १० गोळ्यांची लस देऊन तिला बेशुद्ध केले आणि नंतर तिची हत्या केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा