मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन कंपनी दीड लाख कोटी रुपये गुंतवणूक महाराष्ट्रातील प्रकल्पात करणार होती. या कंपनीकडे महाविकास आघाडी सरकारने किती लाच मागितली होती, असा सवाल करीत मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आमदार आशीष शेलार यांनी या प्रकरणात गोलमाल असून चौकशीची मागणी केली.

हेही वाचा <<< दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्धार

हेही वाचा <<< मराठवाडा मुक्ती संग्राम अभ्यासक्रमात घ्या – राज ठाकरे

गेल्या दोन वर्षांत महाविकास आघाडी सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळला होता. उद्योगांची अनुदाने व सवलती देण्यासाठी १० टक्के लाच मागितली जात होती, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लघु उद्योग भारतीच्या प्रदेश अधिवेशनात शुक्रवारी केला होता. त्याचा संदर्भ देत फॉक्सकॉनकडूनही १० टक्के रक्कम मागितली होती की महापालिकेतील दराने, असा सवाल शेलार यांनी केला आहे.

Story img Loader