लग्न ठरले, साखरपुडा झाला. त्याचाच गैरफायदा उचलत नियोजित नवरदेवाने भावी पत्नीसह शरीरसंबंध ठेवले. पण लग्नाला काही तास उरले असताना लग्नाच्या ऐन आदल्या रात्री या नवरदेवाने लग्नमंडपातून पळ काढला. प्रकरण मिटले असे वाटल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी घरी हजर झाला. पण त्याच्या येण्याची माहिती मिळताच फसवल्या गेलेल्या वधूपक्षाने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि विशाल गायकवाड या नवरदेवाची वरात थेट पोलिस कोठडीत निघाली. विशालवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायन येथे राहणाऱ्या विशाल गायकवाड (२६) या तरुणाचे पुण्यात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीबरोबर लग्न ठरले होते. त्यानंतर विशाल नियमित आपल्या होणाऱ्या पत्नीला भेटत असे. दरम्यान मे महिन्यात लग्नाची संपूर्ण तयारी झाली. आदल्या दिवशी पाहुणे जमले. लग्न होणार असताना आदल्याच रात्री म्हणजे २५ मे रोजी विशाल लग्नमंडपातून गायब झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bride groom arrested run from marriage ceremony
Show comments