मुंबईत मोनो रेल्वे, मेट्रो रेल्वे आदी प्रकल्पांच्या उभारणीच्या वेळी होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मरोळजवळ बुधवारी रात्री उशीरा एमएमआरडीएच्या एका पुलाचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली. पश्चिम द्रुतगती मार्गावरून विमानतळावर जाण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या या पुलाचा ३० मीटर लांबीचा भाग कोसळून त्याखाली तीन जण ठार झाले असून, कित्येक जण जखमी झाल्याची शक्यता अग्निशमन दल व पोलिसांनी वर्तवली. विमानतळ प्राधिकरणच्या समोरील हा पुलाचा भाग असल्याचे सहार पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.
बुधवारी रात्री साडेदहा वाजता घडलेल्या या दुर्घटनेत आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरून आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या या उड्डाणपुलाचे बांधकाम काही वर्षे चालू आहे. या पुलापैकी आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरील व हॉटेल हय्यातजवळील सुमारे ३० मीटर लांबीचा भाग रात्री कोसळला. या वेळी तेथे काम करणारे तीन मजूर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुलाखाली रहदारी सुरू असल्यामुळे आणखी काही लोक अडकण्याची शक्यता आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाडय़ा दाखल झाल्या. यापूर्वी अलिकडेच इस्टर्न फ्री वेचा काही भाग कोसळला होता. तर अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील मेट्रो पुलाचा भागही कोसळल्याची घटना घडली होती.
मरोळजवळ ‘एमएमआरडीए’चा पूल कोसळला; तीन जण ठार
मुंबईत मोनो रेल्वे, मेट्रो रेल्वे आदी प्रकल्पांच्या उभारणीच्या वेळी होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मरोळजवळ बुधवारी रात्री उशीरा एमएमआरडीएच्या एका पुलाचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली.
First published on: 07-02-2013 at 06:55 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bridge collapes in marol andheri