विवाहित महिलेबरोबर अनैतिक संबंध ठेवणाऱ्या लहान भावाचा मोठय़ा भावाने गुरुवारी दादरमध्ये  चाकूने भोसकून खून केला. या प्रकरणी पोलिसांनी नवीन गोस्वामी याला अटक केली.
मूळचे उत्तर प्रदेशमधील नवीन आणि जीतूराज गोस्वामी हे बंधू वांद्रे येथे राहात होते. नवीन हा दादरमधील एका आइस्क्रीम पार्लरमध्ये व्यवस्थापक आहे. जीतूराज याचे एका विवाहित महिलेबरोबर संबंध असल्याचे नवीनला समजले. त्याने महिलेच्या पतीच्या कानावर ही गोष्ट घातली होती. त्यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडू लागले. नवीनने आपल्या विवाहित प्रेयसीच्या पतीस अनैतिक संबंधांबाबत माहिती दिल्याचे जीतूराजला समजले आणि तो प्रचंड संतापला. जीतूराज गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दादरमधील पार्लरमध्ये पोहोचला आणि त्याने नवीनला जाब विचारला. या दोघांमध्ये मोठे भांडण झाले. संतापलेल्या नवीनने चाकूने भोसकून जीतूराजचा खून केला.

Story img Loader