मुंबई : बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची नियमित प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यामधील संस्थात्मक कोट्यातील सुमारे १५०० जागा रिक्त राहिल्या आहेत. देशभरातील रिक्त जागांची संख्या लक्षात घेता भारतीय परिचर्या परिषदेने परिचारिका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने बीएस्सी नर्सिंगच्या रिक्त राहिलेल्या संस्थात्मक जागांसाठी दुसरी विशेष फेरी जाहीर केली आहे. ही फेरी १९ नाेव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची संस्थात्मक प्रवेश प्रक्रिया ३१ ऑक्टोबर रोजी संपली. त्यानंतर भारतीय परिचर्या परिषदेने संस्थात्मक स्तरावर रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अतिरिक्त मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने संस्थात्मक स्तरावरील रिक्त राहिलेल्या जागांसाठी १९ नोव्हेंबरपासून विशेष फेरी जाहीर केली आहे. राज्यामध्ये पाच सरकारी व १७३ खासगी नर्सिंग महाविद्यालये आहेत. सरकारी महाविद्यालयांमध्ये २५० जागा तर खासगी महाविद्यालयांमध्ये ९ हजार २०० जागा आहेत. खासगी महाविद्यालयातील काही जागा संस्थात्मक कोट्यामार्फत भरण्यात येतात. त्यामुळे संस्थात्मक कोट्यातील जवळपास १५०० जागा रिक्त राहिल्या आहेत. त्याचबरोबर तीन नव्या महाविद्यालयांना भारतीय परिचर्या परिषदेने मान्यता दिल्याने १२० नव्या जागा वाढल्या आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास १६२० जागांसाठी ही विशेष फेरी राबवली जाणार आहे.

principal posts , Reservation , MPSC,
अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यावर एमपीएससीने आरक्षण काढून टाकले, आता सर्व पदे खुल्या वर्गासाठी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
rte registration process starting from Tuesday January 14
आरटीई प्रवेशांसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून, किती जागा उपलब्ध?
unregistered doctors , Maharashtra Medical Council,
नोंदणीकृत नसलेल्या डॉक्टरांवर नववर्षात कारवाई, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा निर्णय
hirakani rooms , medical colleges,
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्तनपान कक्ष बांधणार, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ७० कक्ष साकारणार
MPSC announced that it will now conduct screening exams for 33 posts of various types
मोठी बातमी: ‘एमपीएससी’कडून तब्बल ३३ पदांच्या चाळणी परीक्षेसाठी…
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
MPAC Mantra Intelligence Test and Arithmetic Group B Non Gazetted Services Pre Exam sports news
एमपीएसी मंत्र: बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित; गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा

हेही वाचा : Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर

विशेष फेरीसाठी जागांचा तपशील १८ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर १९ ते २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये जाऊन विहित नमून्यामध्ये अर्ज करायचा आहे. त्यानंतर २१ नोव्हेंबर राेजी सायंकाळी ७ वाजाता संबंधित नर्सिंग महाविद्यालयांच्या फलकावर आणि संकेतस्थळावर पहिली निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २२ ते २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सर्व कागदपत्रे व शुल्काच्या डीडीसह प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता दुसरी निवड व प्रतीक्षा यादी महाविद्यालयांच्या फलकावर आणि संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २६ ते २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सर्व कागदपत्रे व शुल्काच्या डीडीसह प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. २९ नाेव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा आणि रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाणार आहे. या रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांना ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजेपर्यंत प्रवेश दिले जातील. या कालावधीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी दुपारी २.३० वाजता जाहीर करण्यात येईल. रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादी जाहीर करून प्रवेश प्रक्रिया संपुष्टात येईल, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा : मतदानाच्या दिवशी वर्सोवा-घाटकोपर मेट्रोच्या वेळेत बदल, पालिकेच्या विनंतीनतर मेट्रो प्रशासनाचा निर्णय, पहिली लोकल पहाटे ४ वाजता सुटणार

या विद्यार्थ्यांसाठी होणार स्वतंत्र परीक्षा

बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनियमित वर्गासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्यात यावी. तसेच परीक्षेला बसण्यासाठी विद्याथ्याची ८० टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे.

राज्यात तीन नवीन महाविद्यालयांना मान्यता

भारतीय परिचर्या परिषदेने राज्यामध्ये तीन नव्या नर्सिंग महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. यामध्ये एक सरकारी व दोन खासगी महाविद्यालयांचा समावेश आहे. सरकारी महाविद्यालयात ५०, तर खासगी महाविद्यालयात ७० जागा उपलब्ध आहेत. या तिन्ही महाविद्यालयांचा या प्रवेश प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली.

Story img Loader