आगामी विधानसभेसाठी बहुजन समाज पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी करणार नसल्याचे पक्षातर्फे गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. बसप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आघाडीबाबतची माहिती अफवाच असल्याचे बसपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. सुरेश माने यांनी सांगितले. विधानसभा निवडणूक बसप स्वबळावर लढणार आहे. केवळ दलितांची मते मिळवण्यासाठीच बसपसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी करणार असल्याची चर्चा घडवून आणण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बुधवारी मायावती यांना भेटणार होते. त्या पार्श्वभूमीवर बसप आणि राष्ट्रवादी आघाडी होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, बसपने ती फेटाळून लावली. लोकसभा निवडणुकीत बसपला राज्यात आप आणि मनसेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत बसप काय करणार याकडे लक्ष होते.

Story img Loader