विनायक डिगे

मुंबई : कुष्ठरोग, सोरायसिस व त्वचारोगासाठी आयुर्वेदामध्ये रुग्णांना बाकुची या औषधी वनस्पतीच्या बिया दिल्या जातात. मात्र या बाकुचीच्या बिया यकृत निकामी करण्यास कारणीभूत ठरत असल्याचे नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या संशोधनातून उघडकीस आले आहे. नायर रुग्णालयामध्ये यकृताचा त्रास असलेले काही रुग्ण दाखल झाले होते. या रुग्णांच्या तपासणीत त्यांच्या यकृतामध्ये बाकुचीच्या बियांचे अंश आढळले. या रुग्णांमध्ये अशक्तपणा, कावीळ, खाज सुटणे आणि पोटाच्या पोकळीमध्ये पाणी जमा होणे असा त्रास होत होता.

Saif Ali Khan Attacked With Knife At Home
Saif Ali Khan Health : “सैफच्या मणक्यात अडीच इंचाचं चाकूचं टोक अडकलं होतं, दोन शस्त्रक्रिया केल्या”, अभिनेत्याच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली सखोल माहिती!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Naturopathic Medical Treatment know Ayurvedic Herbal Natural remedies at home
औषधं, गोळ्या घेऊन कंटाळला आहात? जाणून घ्या घरच्या घरी औषधाविना आयुर्वेदिक उपचार कसे कराल?
young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
hair loss reasons loksatta news
टक्कल, केसगळतीचे कारण काय? चेन्नई, दिल्लीतील पथक शेगावात
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
Lucky bamboo plant care
बांबूचे रोप सुकत चाललयं? ‘या’ सोप्या पद्धतीने घ्या काळजी
Due to lack of accommodation medical students commute to rural health center during internships
आरोग्य केंद्रावरील सेवेसाठी आंतरवासिता डॉक्टरांची पदरमोड, सुविधा पुरविण्याकडे वैद्यकीय महाविद्यालयांचे दुर्लक्ष

या त्रासने ग्रस्त ४४ वर्षीय महिला नायर रुग्णालयात दाखल झाली. तिला ताप, भूक न लागणे, वजन कमी होणे, रक्त कमी होण अशी कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र पाच वर्षांपूर्वी संधिवात झाला होता. त्याच काळात तिला त्वचारोगही झाल्याने ती सहा महिन्यांपासून बाकुचीच्या बिया दिवसातून दोन वेळा घेत होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिच्या यकृताचे कार्य हळूहळू बिघडत असल्याचे लक्षात आले.

हेही वाचा >>>मुख्यमंत्र्यांच्या बीकेसी दसरा मेळाव्याच्या निधीची चौकशी करा म्हणणारेच अनुपस्थित, न्यायालयाने याचिका फेटाळली!

त्यांनी तातडीने बोयोप्सी केली असता तिच्या यकृतामध्ये बाकुची बीमधील फ्रक्टस सोराली घटक आढळला. तिची अल्ट्रासाऊंड तपासणी केली असता यकृत निकामी होत असल्याचे निदर्शनास आले. तिच्यावर ताडीने उपचार केल्यानंतर ती बरी झाल्याची माहिती नायर रुग्णालयातील डॉ. प्रवीण राठी यांनी दिली. अन्य एका ६४ वर्षीय महिलेने रजोनिवृत्तीनंतरच्या ऑस्टियोपोरोसिसच्या उपचारांसाठी नऊ महिने या बियांचे सेवन केले होते. तसेच त्वचारोगासाठी दोन व्यक्तींनी, तर ताप आल्यामुळे एका व्यक्तीने या बियांचे सेवन केल्याने त्यांचे यकृत निकामी झाल्याचे आढळून आले आहे, असे डॉ. राठी यांनी सांगितले. हे संशोधन डॉ. हर्ष गांधी, डॉ. संजय चंदनानी, डॉ. अनुराग जेना, डॉ. शुभम जैन, डॉ. ऋषिकेश मालोकर, डॉ. जय चुडासमा, डॉ. रिमा कामत, डॉ. सायरस फिलिप्स आणि डॉ. प्रवीण राठी यांनी केले.

बाकुचीच्या बियांचा वापर त्वचारोग, ल्युकोडर्मा आणि सोरायसिसची लक्षणे कमी करणे, ऑस्टियोपोरोसिस, रजोनिवृत्तीनंतरची लक्षणे, नैराश्य, नपुंसकत्व आणि कुष्ठरोग यांसारख्या आजारांच्या उपचारासाठी करण्यात येतो.

Story img Loader