कोविडच्या संकटाचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. या अर्थसंकल्पाचे शेअर बाजारानेही स्वागत केलं असून बाजार सुरु झाला तेव्हा तो ४०१ अंकांनी वधारला होता. त्यानंतर बजेटला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा उसळी घेत सेन्सेक्स ८०० अंकांनी वाधारला. त्यामुळे तो ४७,१८५.७५ वर पोहोचला.
Sensex surges 899.98 points, currently at 47,185.75. pic.twitter.com/ta9GEGotls
— ANI (@ANI) February 1, 2021
सकाळी बजेट सादर होण्यापूर्वी बाजार सुरु झाला तेव्हा सेन्सेक्स ४४३ ने तर निफ्टी ११५ अकांनी वधारला होता. सेन्सेक्सच्या चार्टनुसार, इंड्सलँड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, ओएनजीसी, टायटन या कंपन्यांचे शेअर्स प्रामुख्याने आघाडीवर होते. दरम्यान १६ शेअर्स हे ग्रीन ट्रेडिंगमध्ये होते.
शुक्रवारी सेन्सेक्स ५८८.५९ अकांची किंवा १.२६ टक्क्यांनी घट होत बंद झाला होता. त्यामुळे सेन्सेक्स ४६,२८५.७७ वर स्थिरावला होता. तर निफ्टी १८२.९५ अकांनी किंवा १.३२ टक्क्यांनी घसरला होता. त्यामुळे निफ्टी १३,६३४.६० अकांवर स्थिरावला होता.