” हा अर्थसंकल्प देशाचा आहे, देशासाठी आहे की एखाद्या राजकीय पक्षाचा आहे? निधी वाटपाचा. ज्या प्रमाणे निवडणुकीसाठी निधी वाटतात, तसं काही हे राष्ट्रीय कोषातून निवडणुकांसाठी निधी वाटप सुरू आहे का? असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होऊ शकतो. काही राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर कुणी बजेट मांडत असेल. तर त्याला देशाचं बजेट म्हणू नये, एका राजकीय पक्षाचं बजेट म्हणावं.” असा शब्दांमध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पश्चिम बंगाल, केरळ व दक्षिणेकडच्या राज्यांसाठी असलेल्या आर्थिक तरतुदींसदर्भात बोलताना राऊत यांनी हा देशाचा नसून एका राजकीय पक्षाचा अर्थसंकल्प वाटत असल्याची टीका केली.

Budget 2021: सर्वाधिक निराशा महाराष्ट्राच्या वाट्याला – संजय राऊत

नाशिक व नागपूरला भाजपाची सत्ता आहे म्हणून त्यांना मेट्रो दिली का? यावर नाशिक व नागपूरला भाजपाची सत्ता राहणार नाही. पण मुंबईची मेट्रो का लटकवली? असा प्रश्न उपस्थित करत संजय राऊत म्हणाले, ” नाशिक व नागपूरला भाजपाची सत्ता आहे. म्हणून त्यांना मेट्रो दिल्या हे काही मला पटत नाही, कारण नाशिक व नागपूरला यापुढे भाजपाची सत्ता राहणार नाही. नाशिकला तर नक्कीच नाही व नागपूरला तर मोठं युद्ध होईल. मुळात मुंबईची मेट्रो आपण का रखडवून ठेवली आहे? ते बोला. केंद्राची जमीन असल्याचं म्हणतात, ती काय महाराष्ट्रात मंगळावरून की चंद्रावरून आणली आहे का? ती आमचीच जमीन आहे. इथली मेट्रो सुरू करू द्या, नाशिक व नागपुरच्या गोष्टी आम्हाला कशाला सांगत आहात. ती दोन्ही शहरं महाराष्ट्रातच आहेत, उत्तर ध्रुवावर नाहीत.”

कृषी कायदे भांडवलदारांच्या हिताचे –
” शेतकऱ्यांसाठी काही द्यायचं सोडा, ते कधीच देणार नाहीत. पण जे सिंघू बॉर्डरवर बसलेले आहेत त्यांचं तरी ऐका. आज शेतकरी तिथं का बसले आहेत? कारण हे जे तीन कृषी कायदे आहेत ते चार किंवा पाच भांडवलदारांच्या हिताचे आहेत. त्यासाठी हे कायदे बनवण्यात आले आहेत. तुम्ही त्यांचं जरा ऐका. का परत या भांडलवदारांसाठी तुम्ही अर्थसंकल्पातून सर्व आर्थिक यंत्रणा राबवणार आहात?” अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला.

पेट्रोल दर वाढीवरून जोरदार टीका –
“आता पेट्रोल १०० रुपये लिटर झालं आहे. त्यांना बहुतेक हजार रुपये लिटर करून लोकांना कायमचं मारायचं असेल. लॉकडाउनमुळे लोकं घरात होते. आता पेट्रोलमुळे लोकांना बाहेर प्रवास करता येणार नाही. त्यांना घरातच बसावं कायमचं हरीभजन करत, असं त्यांना बहुतेक वाटत असेल.” अशी टीका संजय राऊत यांनी पेट्रोल दरवाढीच्या मुद्यावरून केली.