प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने आपल्या शिक्षण विभागासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा ३,४९७.८२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला असून आगामी वर्षाचा हा अर्थसंकल्प आज, २ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणार आहे. प्रशासकाच्या राजवाटीतील हा दुसरा अर्थसंकल्प आहे.

fees Increase in military schools in maharashtra in after twenty years
राज्यातील सैनिकी शाळांच्या शुल्कात वीस वर्षांनी वाढ; ‘एनडीए’तील मराठी मुलांचा टक्का वाढविण्यासाठी धोरणात सुधारणा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Drugs worth Rs 485 crore seized by Mumbai Police in a year
मुंबई पोलिसांकडून वर्षभरात ४८५ कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त
986 crore loss to Indigo due to rising fuel cost
वाढत्या इंधन खर्चामुळे इंडिगोला ९८६ कोटींचा तोटा
Chhagan Bhujbal, yeola assembly constituency,
छगन भुजबळ यांच्या मालमत्तेत साडेतीन कोटींनी वाढ
7367 crore investment in gold etfs in 2024
गोल्ड ईटीएफमध्ये २०२४ मध्ये ७,३६७ कोटींची गुंतवणूक
profit of kpit technologies in automotive sector
 ‘केपीआयटी’ला २०३ कोटींचा तिमाही नफा
Emaar to invest Rs 2000 crore in Mumbai market
मुंबईसह महाराष्ट्राच्या स्थावर मालमत्ता प्रकल्पांत २,००० कोटींच्या गुंतवणुकीचे एम्मार इंडियाचे नियोजन

चालू आर्थिक वर्षातील सुधारित केलेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत त्यात अवघ्या २९४.७४ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात जुन्या योजनांना बळ देत महापालिकेने १०० शाळांमध्ये ऑरगॅनिक फार्मिग, विद्यार्थ्यांसाठी शब्दकोश, व्याकरणाच्या पुस्तकांचे वाटप, तसेच नावीन्यपूर्ण गणित व विज्ञान केंद्राची उभारणी करण्याचा संकल्प सोडला आहे. दरम्यान, राज्य सरकारकडील तब्बल ५,९४६.३ कोटी रुपयांची थकबाकी मात्र महापालिकेला प्रशासकीय राजवटीतही वसूल करता आलेली नाही.

आणखी वाचा-मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर!

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने गतवर्षी शिक्षण विभागाचा २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ३३४७.१३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. गेल्या वर्षभरात आढावा घेऊन प्रशासनाने चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सुधारणा केली. त्यामुळे १५०.६९ कोटी रुपयांनी कमी होऊन अर्थसंकल्प ३२०२.०८ वर घसरला. त्याचबरोबर २०२३-२४ च्या भांडवली अर्थसंकल्पात ३२० कोटी रुपयांची प्रस्तावित तरतूद सुधारून २५७.३३ कोटी रुपये करण्यात आली होती. त्यामुळे आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात भांडवली कामांसाठी ३३०.१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेने आयसीएसई, सीबीएसई, आयजीसीएसई आणि आयबी शिक्षण मंडळाच्या शाळांची उभारणीस सुरुवात केली असून आगामी वर्षात चार नव्या सीबीएसई शाळा सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे. ५४ खगोल शास्त्रीय प्रयोगशाळाच्या उभारणीची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर ३५ क्रीडा केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. २० केंद्रांच्या उभारणीचे काम सुरू आहे.

महापालिकेच्या २५ माध्यमिक शाळांमध्ये इंटरनेटच्या सुविधेसह चार संगणकांमार्फत ई-वाचनालये सुरू करण्यात आली असून ५० प्राथमिक शाळांमध्ये ई वाचनालये सुरू करण्यात येणार आहेत. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना २०२४-२५ आणि २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांमध्ये शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून त्यासाठी १६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा इमारतींमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही सुरू असून त्यासाठी आठ कोटी रुपयांची तरतूद आगामी अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महानगरपालिका, जिल्हा नियोजन समिती – मुंबई शहर, महापालिका यांच्या संयुक्त विद्यामाने पालिकेच्या १०० शाळांमध्ये ऑरगॅनिक फार्मिक संकल्पना राबविण्याचा संकल्प आगामी अर्थसंकल्पात सोडण्यात आला आहे.

आणखी वाचा-विश्लेषण : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प महत्त्वाचा का असतो? कोणत्या घोषणा अपेक्षित?

शब्दकोश, व्याकरणाची पुस्तके देणार

पालिकेच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते १० वीच्या सुमारे एक लाख ७० हजार विद्यार्थ्यांना मॉडर्न स्कूल डिक्शनरी, (इंग्रजी-मराठी) तसेच शिक्षकांसाठी १२०० शाळांना प्रत्येकी एक शब्दकोश देण्यात येणार असून त्यासाठी ४ कोटी ६९ लाख रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक विभागाच्या २५ शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर नाविन्यपूर्ण गणित व विज्ञान केंद्राची उभारणी करण्यासाठी चार कोटी ५० लाख रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.

सरकारची थकबाकी कायम

प्राथमिक शिक्षणाच्या खर्चापोटी चालू आर्थिक वर्षात राज्य सरकारकडून पालिकेला तब्बल ४,८४३.८२ कोटी रुपये येणे बाकी होते. त्यापैकी केवळ ६४.३४ कोटी रुपये रक्कम पालिकेला मिळाली आहे. उर्वरित तब्बल ४,७७९.४८ कोटी रुपये येणे बाकी आहे. त्याचबरोबर माध्यमिक शिक्षणाच्या खर्चापोटी राज्य सरकारकडून १,१६७.५२ कोटी रुपये येणे बाकी होते. त्यापैकी ७० लाख रुपये पालिकेला प्राप्त झाले असून १,१६६.८२ कोटी रुपये येणे बाकी आहे. राज्य सरकारकडून पालिकेला एकत्रितपणे थकबाकीचे तब्बल ५,९४६.३ कोटी रुपये येणे बाकी आहे..

टॅबद्वारे खेळातून शिक्षण

शिक्षण क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा विचार करून खेळातून शिक्षण या संकल्पनेवर आधारित अॅपद्वारे खेळातून शिक्षण देण्याची योजना राबविण्यात येणार असून माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेल्या १९,४०१ टॅबमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत.