१ कोटी १० लाख रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी सिरोया एफएम कन्स्ट्रक्शनचे बिल्डर श्रेणिक सिरोया यांना अटक केली. भोईवाडा न्यायालयाने त्यांची नंतर जामिनावर सुटका केली.
२०११ स्काय एंटरप्रायझेसला वांद्रे येथे इमारत बांधण्यासाठी सिरोयाने १ कोटी २० लाखांचे दोन धनादेश दिले होते. ते न वटल्याने स्कायने न्यायालयात धाव घेतली होती.