विविध प्रकारचे घोटाळे उघडकीस आणून त्याचा पाठपुरावाही केला. त्यामुळे आर्थिक नुकसान झाल्याने दुखावलेले बिल्डर आपल्यावरील सेटिंगच्या आरोपांमागे असून आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, हवेत गोळीबार करू नये, असे आव्हान विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी राज ठाकरे यांना पुन्हा एकदा दिले.
राज ठाकरे यांनी खडसे यांच्यावर केलेल्या आरोपावरून दोन्ही पक्षांत संघर्ष सुरू झाला आहे. आज विधानसभेत राष्ट्रवादीने हा मुद्दा उकरून काढीत विरोधकांमधील संघर्षांला खातपाणी घालण्याचा प्रयत्न केला. जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांनी विरोधी पक्षनेत्यांवर झालेल्या आरोपामुळे सभागृहातील सर्व सदस्यांच्या चारित्र्यावरच संशय निर्माण झाला असून याचा खुलासा व्हावा अशी मागणी केली. त्यावर सत्ताधारी सदस्यांची समिती नेमून आरोपांची चौकशी करा, आरोपामागील षडयंत्रही बाहेर येऊ द्यात आणि सत्य लोकांना समजू दे, अशी मागणी खडसे यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा