माटुंगा भागात एका बांधकाम व्यावसायिकाने इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मुकेश नवीनचंद सावला (५६) असे या व्यावसायिकाचे नाव आहे.
माटुंग्यातील इंडियन जिमखाना परिसरातील लक्ष्मी निकेतन इमारतीमधील घरातून सावला यांनी उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. सावला हे मागील काही दिवसांपासून नैराश्यात होते.
या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सावला यांनी कोणत्या समस्यांमुळे टोकाचे पाऊल उचलले हे अद्याप समजू शकले नाही. माटुंगा पोलिसांकडून या प्रकरणी तपास करण्यात येत आहे.