भिवंडीनजीक काल्हेर गावात दहा वर्षे जुनी दोन मजली इमारत कोसळल्यामुळे गुरुवारी दोन जण ठार तर २६ जण जखमी झाले. इमारतीच्या ढिगाऱयाखाली आणखी ४ ते ५ जण अडकले असण्याची शक्यता आहे. ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
काल्हेरमधील या इमारतीमध्ये कपड्यांचा कारखाना होता. बिग गारमेंट्स या नावाने ही इमारत ओळखली जायची. बुधवारी रात्री दीड ते दोनच्या दरम्यान ती कोसळली. इमारत कोसळल्यानंतर अग्निशामक दल आणि स्थानिकांच्या मदतीने काही जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमींना आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारत कोसळली त्यावेळी तिथे ४० कामगार काम करीत होते, अशी माहिती पोलिसांनी दिलीये. इमारत कशामुळे कोसळली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
(संग्रहित छायाचित्र) 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा